Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Scholarship Exam Fifth and Eighth

शिष्यवृत्ती  परीक्षा दि.०९/०८/२०२१ ऐवजी १२/०८/२०२१ रोजी घेण्यात येईल. 
संदर्भ - १. उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय यांचे पत्र क्रमांक एफईडी - २०२०/प्र.क्र.४शएसडी-५,
दि. ११/०९/२०२०.
२. शिष्यवृत्ती परीक्षा २०२१ अधिसूचना जा.क्र.मरापप/शिष्यवृत्ती/२०२०-२१/८९१, दि. ०९/०३/२०२१
३. या कार्यालयाचे प्रसिध्दीपत्रक दि. २१/०३/२०२१.
४. उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय यांचे पत्र क्रमांक एफईडी -२०२०/प्र.क्र.४१/एसडी-५,
दि. ३०/०३/२०२१.
५. या कार्यालयाचे प्रसिध्दीपत्रक दि. ३०/०३/२०२१.
६. या कार्यालयाचे प्रसिध्दीपत्रक दि. १०/०५/२०२१.
७. सह सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय यांचे पत्र क्रमांक एफईडी-२०२०/प्र.क्र.४१/एसडी-५,दि.२०/०७/२०२१.
८. या कार्यालयाचे प्रसिध्दीपत्रक दि. २७/०७/२०२१.
महोदय,
उपरोक्त संदर्भ क्र. ८ च्या प्रसिध्दीपत्रकान्वये परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दि. ०९/०८/२०२१ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असलेबाबत जाहिर करण्यात आले होते.
तद्नंतर राज्यातील काही जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पुरपरिस्थिती व बहुतांश ठिकाणी भुस्खलन झाल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणींबाबत राज्यातील अनेक संघटनांकडून प्राप्त निवेदनांचा विचार करता सदर परीक्षा दि.०९/०८/२०२१ ऐवजी १२/०८/२०२१ रोजी घेण्यात येईल. यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र दि. १२/०८/२०२१ च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. त्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. कृपया सदर प्रसिध्दीपत्रकास राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणीवरून व दूरदर्शन केंद्रावरून योग्य ती प्रसिध्दी विनामूल्य देण्यात यावी अशी विनंती आहे.
सोबत :- प्रसिध्दीपत्रक
आपली विश्वासू,
(शैलजा दराडे)
स्थळप्रत मा. आयुक्त यांनी मान्य केलेली आहे.
उपायुक्त
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,Post a Comment

1 Comments

Ad Code